Skip to main content

Posts

हिरण्यदुर्ग - संजय सोनवणी

  पुस्तकाचे नाव : हिरण्यदुर्ग. साहित्य प्रकार : अद्भुतरम्य कादंबरी. लेखक : संजय सोनवणी. मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी. प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे. पृष्ठं : ३५२ किंमत : ३५० रु. अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात या कादंबरी प्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. मुळात कथानक गुंफण्याचं विलक्षण कसब असणारा लेखकच या अद्भुताच्या विश्वात प्रवेश करायला धजावतो. अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार मराठीत सुरु कसा झाला हा एक खरोखर उत्सुकतेचा विषय आहे. गो.ना. दातार यांनी रेनॉल्ड्स या पाश्चात्य लेखकाच्या कादंबर्‍यांची भारतीय रुपांतरे मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे व त्या कादंबर्‍या लोकप्रिय झाल्यावर अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक मराठी लेखक लिहू लागले. पण त्या सर्व कादंबर्‍यांचे सांगाडे विदेशी लेखकांचे असत. अगदी अलिकडे काही दशकांपूर्वी 'मर्मभेद'कार म्हणून गौरविले गेलेल्या शशी भागवतांच्या या कादंबरीतले अद्भुत ऐयार त्याच्याही आधी दोन दशकांपूर्वीच देवकीनंदन खत्रींच्या 'चंद्रकांता' या हिंदी कादंबरीत आ...
Recent posts

शपथ वायुपुत्रांची - अमिश त्रिपाठी (अनुवाद : डॉ. मीना संभू-शेटे)

  पुस्तकाचे नाव : शपथ वायुपुत्रांची मूळ लेखक : अमिश त्रिपाठी मराठी अनुवादः मेघना संभू-शेट्ये पृष्ठसंख्या : ६८४ किंमत : रुपये ३९५ (पण ऑनलाईन मागवल्यास सवलतीत २१० ते २३० पर्यंत  मिळून जाते) शपथ वायुपुत्रांची कालच वाचून झाले. मला तरी शिवा ट्रिलॉजी आवडली. मूळ कथानक केंद्र स्थानी ठेवून मी वाचत असल्यामुळे आणि तांत्रिक, भाषिक, मुद्रण, अनुवाद अशा चुकांकडे दुर्लक्ष करु शकल्यामुळे कथानकाचा खूप मस्तपणे आनंद घेता आला. वायुपुत्रांची शपथ या तिसर्‍या आणि शेवटच्या भागाचा आत्मा दोन प्रमुख गोष्टींत आहे १. कथानकाची लयबद्धता आणि २. सती  या व्यतिरिक्त शिव, गणेश, कार्तिकेय, भगीरथ, भृगू, पाशुपतास्त्राची प्राप्ती, अज्ञात मारेकरी, मेलुहाचा सेनापति इत्यादी प्रमुख गोष्टी आहेतच. तरीही कथानकाचा आत्मा व्यापला आहे तो याच २ गोष्टींनी  सती चे पात्र प्रचंड ताकदीने या भागांत रंगवले गेले आहे. तसे ते सुरुवातीपासूनच होते. पण तिसर्‍या भागाच्या वाचनानंतर मनात काही उरत असेल तर ते शिव नसून सती. हे पात्र खूप ताकदीने रंगवले गेले आहे पण त्यामुळे शिवा ट्रिलॉजीच्या शेवटी शिव कमी उरतो. ...

मेलुहाचे मृत्युंजय - अमिश त्रिपाठी (अनुवाद : डॉ. मीना संभू-शेटे)

  'मेलुहाचे मृत्युंजय'  हा 'द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा' या अमिश त्रिपाठी यांच्या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद काल रात्रीच वाचून झाला. डॉ. मीना संभू-शेटे यांनी मराठी अनुवाद कसदार केला आहे.  पुस्तकातील तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करुन आणि एक फिक्शन (कल्पनाविलास) म्हणून वाचले तर हे पुस्तक चित्तवेधक आहे. खिळवून ठेवण्याची क्षमता या कादंबरीत नक्कीच आहे. तसेच ही कादंबरी वाचकाला पुढील भाग वाचण्यास उद्युक्तही करते. आता पुढील मराठी भाग कधी प्रकाशित होतोय याकडे लक्ष आहे. कादंबरीत शिवाचे पात्र अतिशय सक्षमपणे रंगवलेले आहे. महादेव, रुद्र या विभिन्न व्यक्तीरेखांनंतर शिव हा महादेवाची जबाबदारी स्वीकारणारा श्रीरामानंतरच्या काळातला नायक आहे. महादेवाची जबाबदारी तो पेलू शकेल की नाही याबद्दल शिवाच्या मनातील आंदोलने अतिशय ताकदीने कादंबरीत उतरवलेली आहेत. मेलुहाच्या लोकांची जीवनपद्धती देखील वाचकाला प्रभावित करते. सतिचे पात्र अतिशय प्रभाव टाकते. तसेच कनखला, पार्वतेश्वर व आयुर्वती ही देखील या कादंबरीची लक्षात राहणारी ठळक पात्रे. दक्षाची भूमिका पटत नसली तरी त्याच...

स्टुपिड - सुहास शिरवळकर

  आजच सुहास शिरवळकरांचे 'स्टुपिड' हे पुस्तक वाचून पूर्ण केले. या लेखकाचं कोणतंही पुस्तक उचलावं आणि निखळ वाचनानंदात रमावं असा सिद्धहस्त लेखणीची कृपा असलेल्या मोजक्याच लेखकांपैकी सुहास शिरवळकर होते. 'सुशि' याच नावाने ते वाचकांना परिचित आहेत. 'स्टुपिड' मध्ये दोन कथा आहेत. पहिली अर्थातच 'स्टुपिड' आणि दुसरी 'दि गेसिंग मॅन' पैकी पहिल्यांदा स्टुपिड मधे काय आहे ते पाहू - 'स्टुपिड': चार वर्षे ऑफिसात एकही लेट मार्क नसलेल्या क्लार्कपासून 'स्टुपिड'च्या कथानकाची सुरुवात होते. तुषार कर्णिक, ऑफिसातल्या सहकार्‍यांपासून एकदम अलिप्त पण कामात अगदी चोख अशा पात्रापासून सुरु झालेल्या कथानकाचा नक्की अंदाज सुरुवातीला येत नाही. पण वाचकाला उत्सुकतेबरोबरच गोंधळात टाकायची कला सुशिंनाच जमावी. :) त्याच्या ऑफिसच्या २१व्या माळ्या समोरच्या बिल्डींगच्या समोरच्याच २१व्या माळ्यावर तो एकटक पाहताना दरवाजातून ती बाहेर येताना त्याला दिसते. इथे वाचकाला वाटते की हा तुषार कर्णिक कोणा पोरीच्या प्रेमात आहे की काय? ;) हे काही प्रमाणात खरे असते पण पूर्ण नाही. त...

'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' - नरहर कुरुंदकर

  आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल. 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तारीखवार घटना, आकडेवारी यांना पूर्णपणे फाटा दिलेला आहे, जे नरहर कुरुंदकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या थरारक आयुष्यातील अगदी मोजक्या पण अतिमहत्त्वाच्या घटनाक्रमांवर नरहर कुरुंदकरांनी प्रकाश टाकला आहे. या सुरेख पुस्तकाला स.मा. गर्गे यांची सात पानी प्रस्तावना लाभली आहे तरी पुढची पाने कुरुंदकरांनी ज्या तर्कपद्धतीने व्यापली आहेत ती वाचताना वाचक थक्क होतो. पुस्तकाच्या सुरुवातीलाच कुरुंदकरांनी शिवाजी देवाचा अवतार मानला जातो या श्रद्धेचा वेध घेण्याचा परखड प्रयत्न केला आहे. कुरुंदकर म्हणतात "माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळ...

...आणि पानिपत - संजय सोनवणी

  पुस्तकाचे नाव :  .... आणि पानिपत (कादंबरी) लेखक : संजय सोनवणी प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन, पुणे किंमत: ४०० रुपये पृष्ठसंख्या : ४७२ लेखकाचा ब्लॉग :  http://sanjaysonawani.blogspot.com/ पानिपताचे युद्ध आणि त्याची कारण मीमांसा यावर कित्येक कादंबर्‍या आणि संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत. अलिकडेच मी संजय सोनवणी यांची " ... आणि पानिपत " ही कादंबरी वाचली.  संजय सोनवणी हे संशोधन करुन पुराव्याच्या आधारे  लेखन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सदाशिवराव भाऊंचा तोतया , जनकोजी शिंदेचा तोतया याकडे ऐतिहासिक ग्रंथांनी जरी काणाडोळा केला तरी त्यांची स्फोटकता या कादंबरीत जाणवते. सन  १६८० ते १७६१ एका दलित कुटुंबियाच्या चार अख्ख्या पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला हा थरारक इतिहास काल्पनिक वाटतच नाही एवढा जळजळीत वास्तव वाटतो. भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला', किरण नगरकर यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या त्या काळात त्यांनी प्रचंड खळबळ उडविली होती. "...आणि पानिपत" ही देखील अशीच खळबळजनक कादंबरी आहे. "...आणि पानिपत " चे लेखक ...

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

  नमस्कार मित्रांनो, मी बरीच पुस्तके वाचली आहेत. "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही. मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्य वाचा.लोकशाही कशी सरणावर जाते आणि हिटलरसारखे हुकुमशहा सत्तेवर कसे येतात याचा हा थरारक इतिहास आहे. मी काही हिटलरची भलावण नाही करत. पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.शिवाय आपल्याला जो दुसर्‍या महायुद्धाचा जो इतिहास उपलब्ध आहे तो बराचसा जेत्यांनी लिहीलेला आहे.ही इतिहासाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती पहील्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या अत्याचारांची.कानिटकरांनी दुस-या महायुद्धाचा हा थरारक इतिहास लिहिताना याचे भान ठेवल्याचे जाणवते. दुसर्‍या महायुद्धाचे बीज पहील्या महायुद्धातच पेरले गेले होते.अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते.फारसा मोठा लष्करी पर...